MEDIA COVERAGE

प्रतिनिधी, मुंबई
Published: Sunday, March 24, 2013
कलात्मक आणि सृजनात्मक विचारशैलीतून छायाचित्रण करणाऱ्या नवख्या तसेच पारंगत छायाचित्रकारांसाठी 'युनिव्हर्सल मराठी' या संस्थेने 'क्लिक' ही ऑनलाइन फोटोग्राफी फेस्टिव्हल २०१३ आयोजन केले आहे. स्पध्रेला फेसबुक युजर्सचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. छायाचित्रण कौशल्याला सोशल नेटवर्कच्या माध्यमातून उत्तेजन दिल्याने देशविदेशातूनही छायाचित्रे स्पध्रेसाठी येऊ लागली आहेत. स्पध्रेत भाग घेणाऱ्या सर्व इच्छुकांनी आपले कलात्मक छायाचित्र आणि आपली माहिती click_universalmarathi@live.com या ई-मेल आयडीवर २७ मार्चपूर्वी पाठवावी, असे आवाहन युनिव्हर्सल मराठीचे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी के ले आहे. विस्टाजचे चेतन माथूर, एफएमजेसीचे प्रदीप गुप्ता, मंथनचे शशिकांत गवळी, स्वप्नसिद्धीमोवीजचे दत्ता जामखंडे आणि माइंडसेटचे प्रशांत कदम यांच्याकडून स्पध्रेचे परीक्षण केले जाणार आहे. छायाचित्रांचे खुले प्रदर्शन युनिव्हर्सल मराठीच्या माय मुंबई लघुपट महोत्सवात सादर केले जाईल. १ ते १५ एप्रिलपर्यंत फेसबुकवर पात्र स्पर्धकांची छायाचित्रे अपलोड करण्यात येतील. त्या माध्यमातून स्पर्धकांचे छायाचित्र अधिकाधिक फेसबुक युजर्सना पाहता येईल. युजर्सच्या अधिकाधिक लाइक्स मिळवणाऱ्या तसेच परीक्षकांकडून निवडल्या जाणाऱ्या स्पर्धकाला विजेतेपद देण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९८३३०७५७०६, ९७६८९३०८५३ या क्रमांकांवर संपर्क साधावा.


तरुणाई होणार 'क्‍लिक'
Saturday, March 02, 2013 AT 03:00 AM (IST)     

मुंबई - मोबाईलमध्ये कॅमेरा आला आणि प्रत्येकालाच छायाचित्रे टिपण्याचा छंद जडला. फोटो काढून सोशल नेटवर्किंग साईटवर अपलोड करण्याचा "ट्रेंड' तरुण पिढीत आहे. छायाचित्रणाच्या कौशल्यास प्रदर्शनाचा मंच "युनिव्हर्सल मराठी' संस्थेने "क्‍लिक (स्टोरी टेलिंग पिक्‍चर) ऑनलाईन फोटोग्राफी फेस्टिव्हल'च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे.
एक छायाचित्र दहा शब्दांचे काम करते, असे म्हणतात. अनेक जण छायाचित्रे टिपतात, त्यातील काही फोटो उत्तम असतात. मात्र, त्यांचे म्हणावे तसे कौतुक होत नाही. कौशल्यवाढीच्या उपक्रमासाठी इंटरनेटचा वापर व्हावा, म्हणून यंदा प्रथमच हा ऑनलाईन छायाचित्र महोत्सव आयोजन करत असल्याचे "युनिव्हर्सल मराठी'चे सरचिटणीस अमितराज निर्मल यांनी सांगितले.
"क्‍लिक'साठी छायाचित्रे 14 मार्च पर्यंत www.clickonlinephotographyfestival2013.blogspot.com या साईटवर अपलोड करायची आहेत. केतन माथूर, प्रशांत कदम, दत्ता जामखंडे आदी तज्ज्ञ त्या छायाचित्रांचे परीक्षण करणार आहेत. हे फोटो "युनिव्हर्सल मराठी'च्या "माय मुंबई' या शॉर्टफिल्म फेस्टिव्हलम प्रदर्शित केली जातील. विजेत्या छायाचित्रांना पारितोषिके आणि सर्व सहभागींना "ऑनलाईन सर्टिफिकेट' देण्यात येईल.


http://www.esakal.com/esakal/20130302/5713737207375275989.htm

No comments:

Post a Comment